हेड-लाईट नसलेली बस खड्ड्यात कोसळल्याने बसमधील ३१ प्रवाशांच्या काळजाचा चुकला ठोका

अमळनेर (खबरीलाल)  हेड लाईट नसलेली बस अंधारात ८ ते १० फूट खाली खड्ड्यात कोसळल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने बस पुढील दरीत न कोसळल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. जळोद गावाजवळ शनिवारी सायंकाळी  यावल-धुळे बसला हा अपघात झाला. यातील ३१ प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

      सावखेडा येथील पुलाचे काम सुरू असल्याने चोपद्याकडून येणाऱ्या बसेस जळोद मार्गे येतात. २८ रोजी सायंकाळी यावल-धुळे बस (क्रमांक एम एच- १४ , डी पी १८५८) ही धुळे आगारची बस चालक मोहन किसन पवार व वाहक आर. बी. चव्हाण हे हातेड गावापासून विना दिव्यांची आणत होते. रात्रीची वेळ होती, म्हणून अर्ध्या रस्त्यात थांबण्यापेक्षा जळोदपर्यंत बस नेऊ म्हणून तशीच बस आणली. नदी पार केल्यानंतर अमळनेरच्या बाजूला अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने   अचानक बस १० ते १५ फूट खाली घसरली. रस्त्यालगतच्या लोखंडी खांबामुळे बस अडकली. सुदैवाने बसमधील ३१ प्रवाश्यांना किरकोळ खरचटले.

पोलिस पाटीलसह ग्रामस्थ धावले मदतीला

ताबड़तोब पोलिस पाटील अशोक शिरसाठ , रघु धनगर , भारत भोई , अर्जुन कोळी , व इतर ग्रामस्थ मदतीला धावले. बसच्या मागील संकटकाळीं मार्गातून प्रवाश्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना खाजगी लक्झरी बस मधून प्रत्येकाच्या गावाला रवाना करण्यात आले. यावेळी अमळनेर आगारचा दूरध्वनी कोणी उचलत नव्हते. अशी खंत पोलीस पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *