अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या नोकर कपातीच्या धोरणाचा फटका ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेला बसत आहे. असाच फटका अमळनेर तालुक्यातील मुडी, बोदर्डे, कळंबे या तिन्ही गावात पोस्टमास्तर नसल्याने बसत आहे. त्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून या तिन्ही गावांसाठी एकटीच रनरागिणी आपल्या पायात भिंगरी बांधून टपाल वाटपाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. उन, वारा, पाऊस झेलत आपल्या कामाची ‘शोभा’ त्या वाढवत आहे.
इंटरनेच्या जाळ्याने सर्व सहज आणि सोपे झाले असले तरी काही सेवा घरपोच मिळण्याचे महत्त्व आजही अबाधित आहे. त्यात पोस्ट सेवा ही गणली जाते. ग्रामीण भागात या सेवा आजही अविरत चालू ठेवण्याशिवया पर्याय नाही. कारण विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे असोत कृषी माहिती विषयक मासिके, पेन्शन धारकांचे रजिस्टर, पत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी सुविधा या पोस्टानेच मिळतात. त्यामुळे पोस्टमानचे महत्त्व आजही ग्रामीण भागात अबाधितच आहे. पण आजही अनेक ठिकाणी पोस्टमनची पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
पंधरा वर्षांपासून पोस्टमनच नाही
अमळनेर तालुक्यातील मुडी, बोदर्डे़ , कळंबे, या तिन्ही गावांत गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून पोष्टमनच नाही. यामुळे पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना अत्यावश्यक सुविधा वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. अमळनेर मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये, शासनाकडे व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करून देखील पोस्टमन उपलब्ध होत नसल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच येत्या काही दिवसांत केंद्र शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे.
पोस्टमास्तर असूनही महिला करताय पोस्टमनची ड्यूटी मुडी पोस्टच्या पोस्टमास्तर शोभाबाई नवल पाटील यांच्याकडे मुडीसह बोदर्डे कळंबे या गावांचा पदभार दिला आहे. पण या तिन्ही गावांसाठी एकही पोस्टमन नाही. त्यामुळे शोभाभाई पाटील यांनाच पोस्टमनची ड्यूटी करावी लागत आहे. या तिन्ही गावातील टपाल त्या स्वतः किंवा कोणाचही तरी मदत घेऊन वाटप करीत आहे. त्या आपल्या परिने सर्व टपाल वेळेवर पोहचवण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र काहीवेळा अडचण येते. महिला असून ते रनरागिणीसारख्या पायात भिंगरी बांधल्यासराख्या या तिन्ही गावाला सेवा देत आहेत. याकडे मात्र त्यांच्या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पोस्टमन दिल्यास या तिन्ही गावांना वेळेत सेवा मिळू शकते. पण ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करूनही पोस्टमन मिळत नसल्याने अनेकदा ग्रामस्थांनी गैरसोय होत असल्याने त्वरीत पोस्टमन मिळण्याची मागणी होत आहे.