अमळनेर( प्रतिनिधी) खानदेशातून अनिल पाटील हे एकमेव राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे खानदेशाला न्याय देण्यासाठी दि ३० रोजी होत असलेल्या मंत्रिपद वाटपात त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता मंगळग्रह मंदिरात जाऊन आरती केली व मंगळग्रह महाराजांना साकडे घातले.
आपला उमेदवारी अर्ज दाखल करतांना मंगळग्रह मंदिरावर जाऊन तेथून दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज केला होता. त्यानंतर मतमोजणीत विजय निकट येताच पुन्हा मंगळावर जाऊन दर्शन घेतले होते. आता मंत्रीपद मिळावे यासाठी तालुका व शहर कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन साकडे घातले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील, अर्बन बँक संचालक प्रवीण पाटील, अनिल शिसोदे, राजश्री पाटील, रंजना देशमुख, करुणा सोनार, प्रियंका पाटील, मुक्तार खाटीक, प्रा सुरेश पाटील, संजय भिला पाटील, विनोद कदम विलास पाटील जे के पाटील, निशांत अग्रवाल, भूषण भदाणे, राहुल पाटील पाटील पाटील राजेंद्र देशमुख कैलास पाटील, रणजित सिंग, राजपूत सुनील शिंपी, दिलीप ठेकेदार, संजय ठेकेदार, संभाजी पाटील, एड यज्ञेश्वर पाटील, सनी गायकवाड, राजू पारधी, राजेश कोठावदे, देविदास देसले, अभिषेक ढमाळ, आबा टेलर, ठाकरे सर, नितीन भदाणे, महेश कासार आबीद अली, उमेश सोनार अलीम मुजावर, मुन्ना पवार हर्षल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.