अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील शिवाजी राजपूत मित्र परिवार आणि ग्रामस्थतर्फे शनिवार २८ डिसेंबर रोजी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांच्या पुण्यस्मरणार्थ कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता ह. भ. प. उमेश महाराज दहीवद खुर्दकर यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. पंचक्रोशीतील भाविक आणि कार्यकर्त्यांनी कीर्तनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केली आहे.