महिलेवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालक हैवानाला बदळत पोलिसांच्या केले हवाली

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शाह आलमनगर भागात महिलेचा पती बाहेर गेल्याची संधी साधत एक रिक्षाचालकाने घरात घुसून महिलेवर बलात्कार केल्याची संताप जनक घटना २७ रोजी रात्री 1वाजेच्या सुमारास  घडली. या हैवानाला नागरिकांनी बदळत पोलिसांच्या हवाली केली. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

       या बाबत अधिक माहिती अशी की, शाहआलम नगर भागातील एक महिलेचा चालक पती नाशिक येथे कामाला गेला असल्याने रिक्षाचालक दिगंबर साखरलाल महाजन हा २७ रोजी पहाटे १ वाजता तिच्या घरी जाऊन दरवाजा वाजवला महिलेने दरवाजा उघडताच त्याने घरात प्रवेश करून तिच्याशी शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर तिच्या तोंडावर हात ठेवून बलात्कार केला. तोंडावरील हात निघताच महिलेने आरडाओरड केली. तेंव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले. तो पळून जात असताना नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दिगंबरला रात्रीच अटक करण्यात आली. सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *