सुरत येथे लग्नाला गेलेल्या महिलेच्या  घरात चोरट्यांनी केली हातसफाई

अमळनेर (प्रतिनिधी) सुरत येथे लग्नाला गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांनी हातसफाई करून रोख रकमेसह ४४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागात घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील समीना परवीन शेख या २४ डिसेंबरपासून तीन दिवस सुरत येथे लग्नाला गेले असताना अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरातील २२ हजार रुपये रोख व साडे सात ग्राम सोने असा एकूण ४४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरत्याविरुद्ध भादवी ४५४,४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पीएसआय गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

ढेकू रोडवरील हरी ओम नगरातून 
चोरटय़ाने मोटारसायकल पळवली 

दरम्यान,  ढेकू रोडवरील हरी ओम नगरमधील एकनाथ नामदेव पाटील यांच्या मालकीची मोटरसायकल (क्र एमएच- १९, डीबी- ४६२७) ही अज्ञात चोरट्याने २० रोजी चोरून नेली. अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास बापू साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *