अमळगांवात समाज मंदिरावरून दोन कुटुंबात वाद होऊन लाकडी दांड्याने केली हाणामारी

अमळनेर (प्रतिनिधी) समाज मंदिरावरून दोन कुटुंबात वाद होऊन एकमेकांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात केल्याची घटना तालुक्यातील अमळगाव येथे घडली. या प्रकरणी परस्परविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  कमलाबाई भटू पारधी या महिलेने फिर्याद दिली की २६ रोजी दुपारी ती स्वतः तिच्या मुलगी ज्योती विलास पारधी हिच्यासह सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेली असता तिकडून परत येताना निंभोरा रोडवरील संजय बुधा धोबी, परशु संजय धोबी या दोघांनी महिलेचा भाऊ बन्सीलाल याला शिवीगाळ करणे सुरु केले. त्यावेळी माय लेकिनी त्यांना शिवीगाळ का करत आहेत? असा  जाब विचारला असता त्यांनी अश्लील शिवीगाळ करून आईला व मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तर संजय बुधा भोई यांनी फिर्याद दिली की, पारधी व धोबी समाजाच्या मंदिराची जागा जवळजवळ असून ती जागा मोजत असताना बन्सीलाल धाकू पारधी, आकाश बन्सीलाल पारधी व कमलबाई   भटू पारधी यांनी पत्नी, मुलाला व मुलीला शिवीगाळ  करून पत्नी व मुलीला लाकडी दंडक्याने मारहाण केली.
दोघांनाच्या परस्पर फिर्यादीवरून दोन्ही कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भादवी ३२४ ,२९४, ५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले असून तपास एएसआय संतोष पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *