अमळनेर (प्रतिनिधी) झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील ” प्री-वेडिंग” या या भागात फोटोग्राफराची इमेज अत्यंत चुकीची दाखवली आहे. यामुळे फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या बांधवांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. नीलेश साबळे यांना अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनने निवेदन पाठवून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.
डॉ. नीलेश साबळे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘चला हवा येऊ द्या’चा २३ डिसेंबर रोजी झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार अभिजा भावे, राहुल मदगुल, राज हंचनाळे या कलाकरानी ” प्री-वेडिंग” संदर्भात कला सादर केली. त्यात आमच्या सारख्या असंख्य फोटोग्राफर लोकांची मन दुखावली आहेत ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम यशाच्या सर्वोच्य शिखरावर आहे. त्यातील कॉमेडी ही कुटुंबाने एकत्र बसून बघावी इतकी सुंदर असते. आपल्या कार्यक्रमात आपण सर्वच क्षेत्रातील व्यवसाय, नोकरी, राजकारण, समाजकार्य यावर अफलातून टायमिंगने कॉमेडी करत असतात आणि आम्ही सर्व ती दिलखुलास पाहत असतो, आनंद घेत असतो. परंतु दि. २३ डिसेंबर रोजीच्या आपल्या कार्यक्रमात ‘प्री वेडिंग” शूट दाखवताना फोटोग्राफरची इमेज ही एकदम चुकीची दाखवली.
आम्ही असे म्हणत नाही की, सर्वच चांगले असतात. असेही महाभाग असतातच पण ते ०.०१ टक्के असतात. आपल्या कलाकार लोकांना ‘प्री-वेडिंग’ फक्त करमणूक वाटत असेल. विनोदाचा भाग असेल, परंतु आम्हा फोटोग्राफर बांधवांना ते खूप मोठे आमचे घर चालवण्यासाठीचे व उत्पानाचे साधन आहे. आधीच मोबाइलमुळे फोटोग्राफी व्यवसाय धोक्यात आला आहे. आपण तरी हे आमचे उत्पन्नचे साधन चुकीचे असे दर्शवून चुकीचा मेसेज समाजात देऊ नका व फोटोग्राफर बांधवांची प्रतिमा मलिन करु नका. आपला कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या पाठीवर असणारे सर्वच मंडळी, फॅमिली बघत असते, त्यांच्यात ९९.९९% चांगले असणाऱ्या फोटोग्राफर यांची इमेज ही खराब होऊ नये अशी विनंती अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील, सचिव दीपक बारी, खजिनदार मनोज चित्ते यांनी केली आहे.
पुढच्या कार्यक्रमात असा उल्लेख करून दाखवल्यास आमच्या फोटोग्राफर वरिल विश्वास कायम राहील
सर्वच फोटोग्राफर असे नसतात ही आम्ही जस्ट कॉमेडी दाखवली असा उल्लेख जरूर करावा. जेणे करून फोटोग्राफर यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चांगला राहील, अशी मागणी ही केली आहे.
छायाचित्रकार म्हणजे तुमच्या आठवणींची साठवण करून देणारे एक सुंदर माध्यम
प्रत्येकाचे आयुष्य आनंद, दुःख, अत्यानंद, आश्चर्य, तुमच दिसणं, मुरडन, लटक रागावन, लाजन, लाजून हासन, हे सर्वच तुमच्या आयुष्यातील क्षण आणि क्षण जो छायाचित्रात कैद करून तुमच्या आठवणीची साठवण करतो. आणि आयुष्यभर आनंद देतो तो छायाचित्रकार, असतो असेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने यू ट्यूबवर टाकलेली लिंक केली डिलीट
https://youtu.be/xTkpUi4bUS0?t=41
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील ”प्री – वेडिंग” या भागात फोटोग्राफराची इमेज अत्यंत चुकीची दाखवली आहे. यामुळे फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या बांधवांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने यू ट्यूबवर टाकलेली लिंक डिलीट करण्यात आली आहे.