अमळनेर (प्रतिनिधी) “जागतिक संविधान व संसदीय संघ ( डब्ल्यू सीपीए ) वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट असोसिएशन तर्फे ” ग्लोबल फ्रेंड ऑफ नेचर अवॉर्ड -२०१९ ” प्राप्त पक्षी प्रेमी शिक्षक आश्विन लिलाचंद पाटील यांचा अंबरीष महाराज टेकडी ग्रुपकडून गुरुवारी करण्यात आला.
पक्षी प्रेमी शिक्षक आश्विन पाटील यांना त्यांच्या पर्यावरण संवर्धनसंदर्भात केलेल्या कार्याची विशेष दखल घेऊन “जागतिक संविधान व संसदीय संघ ( डब्ल्यूसीपीए ) वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन पार्लमेंट असोसिएशन तर्फे ” ग्लोबल फ्रेंड ऑफ नेचर अवॉर्ड -२०१९ ” हा पर्यावरण क्षेत्रातील अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन दि.२३ डिसेंबर २०१९ रोजी डब्ल्यूसीपीए (WCPA) चे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टीन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर येथे सन्मानित करण्यात आला. यानिमित्त त्यांचा सत्कार आपल्या श्री अंबरीष महाराज टेकडी ग्रुप कडून करण्यात आला. कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक आंबादास मोरे आणि अंबरीष महाराज टेकडी ग्रुपचे मावळे उपस्थित होते.