अमळनेर(प्रतिनिधी) उत्कृष्ट पत्रकारिता केल्याने अमळनेर येथील पत्रकार तथा शिक्षक ईश्वर रामदास महाजन यांन वर्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पत्रकारिता अवार्ड २०१९ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रीरामपूर येथे २३ डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले.
डब्ल्यू सीपीए या संस्थेचे अमेरिकेचे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, तहसीलदार प्रशांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक प्रा.ई.पी.मेनन, अर्थतज्ज्ञ बंगोलरचे प्रा.नरसिंहा मूर्ती,अध्यक्ष दत्ता विघावे यांच्या हस्ते सन्मान पत्र,स्मृतीचिन्ह, डब्लूसीपीएचे सभासदत्व देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकारितेत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विषयावर उत्कृष्ट लेखन केल्याने झाला गौरव
एकविस बायनेम बातम्या , सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, विषयावर उत्कृष्ट लेखन यामुळे संस्थेने दखल घेऊन जळगाव जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात एकमेव निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर , महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळीचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी व राजकीय , शैक्षणिक, सामाजिक पत्रकारिता,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे .