अमळनेर(प्रतिनिधी) कुमार साहित्य संमेलनासाठी अमळनेर येथील पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कथाकथन आणि काव्य वाचनासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खान्देश बाल साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन हे खान्देशात दरवर्षी केले जात असते. याच अनुषंगाने जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने हे संमेलन दिनांक १० जानेवारी रोजी आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १९ डिसेंबर रोजी डॉ. अविनाश आचार्य विद्यालय येथे संमेलन निवड पात्रता फेरीचे आयोजन केले होते. या निवड पात्रता फेरीसाठी पी.बी.ए.इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमिक विभागाचे चार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. जळगाव, धुळे, नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील स्पर्धक ह्या फेरीसाठी हजर होते. अनेक नामवंत लेखक- लेखिका, कवी- कवित्री या परीक्षेत निवड मंडळाचे सदस्य होते. त्यांच्याद्वारे ही पात्रता निवडी फेरी झाली.
या विद्यार्थ्यांची झाली निवड
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रितेश विकास मगरे-कथाकथन, अवनी मंदार कुलकर्णी -काव्यवाचन, समृद्धी योगेश सुहागीर- काव्यवाचन यांची या वेगवेगळ्या फेरीसाठी निवड झाली. त्यांना शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजरातथी, मुख्याध्यापक जे.एस.देवरे, पर्यवेक्षिका एम. एस. बारी,व्हि.पी. बडवे, सुचिता वैद्य, प्रशांत वंजारी, सुरेखा सैदाने व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.