अमळनेर(प्रतिनिधी) येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्वातंत्र्य सेनानी पु. साने गुरुजी यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना श्यामची आई या पुस्तकातील कथा ऐकविण्यात आली.तर ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना म्हणून विद्यार्थांनी सानेगुरुजी यांचे स्मरण केले. मुख्याध्यापक रणजित शिंदे अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी पू. साने गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक रणजित शिंदे, प्रमुख पाहुणे विद्याधन अकॅडमीचे संचालक प्रा.संजय न्हायदे आदिंनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.यावेळी अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना ‘साने गुरुजींनी सांगितलेल्या जगाला प्रेम अर्पावे या मूल्याधिष्ठित मानवतेच्या खऱ्या धर्माचे पालन करणे हिच काळाची गरज आहे!’ असे प्रतिपादन रणजित शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश महाळपुरकर यांनी तर प्रास्तविक सौ संगिता पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांना श्यामची आई यातील कथा वाचक भैय्यासाहेब मगर यांच्या आवाजातील श्राव्यकथा विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली.व श्यामची आई कथा एकविण्याच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आभार धर्मा धनगर यांनी मानले.याप्रसंगी शिक्षक आनंदा पाटील,गीतांजली पाटील,सौ संध्या ढबू आदिंसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.