अमळनेर(प्रतिनिधी) श्रीलंका आपल्याकडून पेट्रोल विकत घेऊन ५१ रुपये दराने विकते आणि आपण भारतात राहून ८० रुपये लिटरने पेट्रोल विकत घेतो, अशा परिस्थितीत पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या नियंत्रणाखाली येणे अत्यावश्यक आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका संघटक राजेंद्र सुतार यांनी मांडले.
महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत अंमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तेहेतिसावा राष्ट्रीय ग्राहक दिन येथील गंगाराम सखाराम हायस्कूल मधील आय एम ए हॉलमध्ये मंगळवारी २४ रोजी मोठ्या उत्साहात झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून तालुका संघटक राजेंद्र सुतार बोलत होते. राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य व जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तहसीलदार मिलिंद वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तालुका अध्यक्ष मकसूद भाई बोहरी यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक पंचायतीचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शुक्ल, प्रास्ताविक मकसूद भाई बोहरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन महिला आघाडी प्रमुख ॲड. भारती अग्रवाल यांनी केले. याप्रसंगी चोपडा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष केदार पाटील यांनी सायबर क्राईम याबाबत प्रात्यक्षिक दाखवून सभागृहाला महत्त्वपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश गुलाबराव बापू पाटील, जी. एस. हायस्कूलचे चेअरमन योगेश भाई मुंदडा, पुरवठा अधिकारी संतोष बावणे, वजनमाप अधिकारी कुवरसिंग राजपूत, दिशा गॅस एजन्सीचे दिनेश रेजा व पारख एजन्सीचे रितेश पारख, अशासकीय सदस्य सतीश देशमुख, अमळनेर ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. मनोहर शेठ भांडारकर, ऊर्जा मित्र सुनील वाघ आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिशा गॅस एजन्सीचे दिनेश भाई यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला व प्रमुख पाहुण्यांना गॅस सिलेंडर विषय प्रात्यक्षिक करून त्यांच्या मनातील भीती घालवली. तसेच ग्राहक सप्ताहानिमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेचे विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक आर. पी. साळुंखे, अशोक ठाकरे, गंगाधर सोनवणे, विनिता शुक्ल, रत्ना वानखेडे, ना.गो. पाटील तसेच ग्राहक पंचायतीचे सदस्य ऊर्जा मित्र सुनील वाघ, सहसचिव योगेश पाने, ताहा बुकवाला, खदीर सादिक, हेमंत भांडारकर, अॅड. कुंदन साळुंखे, मधुकर सोनार तसेच महिला सदस्या करुणा सोनार, अंजू ढवळे, वनश्री अमृतकार अॅड. उर्मीला अग्रवाल, मेहराज बोहरी त्याचप्रमाणे खान्देश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा माधुरी पाटील व अलका गोसावी हे खास उपस्थित होते. तसेच जी.एस हायस्कूलचे मुख्याध्यापक मोराणकर, पर्यवेक्षक पाटकरी, चौधरी, पाटील मॅडम, मेखा तसेच शिक्षक बंधू उपस्थित होते. सदरचा कार्यक्रमास जी एस हायस्कूल चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन दिवसात अमळनेर तहसील कार्यालयात नागरिक सनद लावण्यात येईल : तहसीलदार मिलिंद वाघ
तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून तालुका अध्यक्ष मकसूद भाई बोहरी यांच्या नागरिक सनद या मागणीस त्वरित मान्यता देऊन येत्या दोन दिवसात अमळनेर तहसील कार्यालयात नागरिक सनद लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी पुरवठा अधिकारी संतोष बावणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रबद्ध सूत्रसंचालन सचिव विजय शुक्ल यांनी केले.