अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील धार येथे शेतातून कापूस चोरताना महिलेला रंगेहात पकडण्यात आले तर एकलहरे येथे एकाला अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणात संशयितांविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी तालुक्यातील धार येथे २३ रोजी सकाळी ८ वाजता शांताराम टोंगल पाटील हे आपल्या शेतात गेले असता त्यांना त्यांच्या मुलाच्या शेतात कुसुमबाई वसंत सैंदाने (रा. धार) ही महिला ५०० रुपयांचा १० ते १२ किलो कापूस चोरताना आढळून आली. मारवड पोलिस स्टेशनला भादंवि ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मुकेश साळुंखे करीत आहेत.
एकलहरे येथे ट्रॅक्टरमधून ५ हजार रुपये
किमतीची वाळू अवैधरित्या वाहतूक
तालुक्यातील एकलहरे येथील कीर्तीकुमार सयाजीराव पाटील हे आपल्या ट्रॅक्टर मधून ५ हजार रुपये किमतीची वाळू अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्याने तलाठी पिंटू चव्हाण यांनी मारवड पोलिस स्टेशनला भादवी 379 , 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल रोहिदास जाधव करीत आहेत.