अमळनेर (प्रतिनिधी) केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा संशोधन कायदा (सीएए व एनआरसी ) च्या समर्थनार्थ अभाविप व राष्ट्रीय सुरक्षा मंच संघटनेतर्फे अमळनेर शहरातून रॅली काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप होऊन सभेत रुपांतर झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर सुभाष चौकात सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कुंटे रोड , बालेमिया मशिद , पाचपावली मंदिर , बसस्थानक मार्गे मोर्चा तहसील कचेरी बाहेरील प्रांगणात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी प्रा. धीरज वैष्णव व अभाविपचे जिल्हा संघटनमंत्री सिद्धेश लटपटे यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम, देश के गद्दारोको, गोली मारो सालोको अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, डॉ. चंद्रकांत पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल , बाजार समिती सभापती प्रफूल पाटील , शीतल देशमुख , राकेश पाटील , अजय केले, डॉ. संजय शाह, नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, अरबन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा, प्रीतम मणियार, विनोद अग्रवाल, समाधान धनगर, प्रा. धनंजय चौधरी, शाम अहिरे, प्रशांत सिंघवी, पंकज भोई, पांडुरंग महाजन, मनोहर महाजन, रवींद्र चौधरी, मनीष जोशी, योगीराज चव्हाण, दिनेश चौधरी, उमेश वाल्हे, शरद सोनवणे, कमलेश आर्य, प्रा. धर्मसिंह पाटील, रोहित शाह, स्वप्निल पाटील, सुनिल भोई, मच्छिन्द्र लांडगे, आबा भदाणे, कैलास भावसार, निकुंभ, चेतन जैन, पराग पाटील, प्रदीप अग्रवाल, प्रितपाल बग्गा, जिजाब पाटील, नीलेश भांडारकर, देवेंद्र परदेशी, दीपक पाटील, हरचंद लांडगे, हिरालाल पाटील, झुलाल पाटील, राजेश वाघ, हरचंद लांडगे, रावसाहेब पाटील, दत्त नाईक, पंडित नाईक प्रकाश मुंदडा, नरेंद्र चौधरी, लालचंद सैनांनी, बजरंग अग्रवाल, नरेंद्र निकुंभ, बापू हिंदुजा, चांदू परदेशी, हिरालाल पाटील, कासार, राकेश माहेश्वरी, अजय रोडगे, देवा लांडगे उपस्थित होते.
नागरिकत्व काद्यातून भारताने जगाला
दाखवून दिला मानवतेचा दृष्टिकोन
नागरिकत्व सुधारणा कायदा १९९५ साली आला असून त्यात सुधारणा करण्यात आली आहे. हा कायदा भारताच्या सीमेलगत जोडलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या तीन देशांकरिता असून तेथील अल्पसंख्यांक नागरिकांवर अन्याय अत्याचार झाल्याने ते देश सोडून भारतात आले आहेत. या काद्यातून भारताने जगाला मानवता दृष्टिकोनातून दाखवून दिला आहे, असे प्रतिपादन पीयुष सोनार यांनी सभेला संबोधित करताना केले.