कृषीसंदर्भात वीज वितरण कंपनीचे आडमुठे धोरण बदलून कृषिपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आणि कृषिपंपांना दिवासा वीजपुरवाठ करण्यात यावा, अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी उर्जामंत्री आणि कृषीमंत्रीय यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना पुढील हंगामात अपेक्षेप्रमाणे उत्पन्न यावे, यासाठी ग्रामीण भागातील कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार स्मिता वाघ यांनी राज्याचे ऊर्जामंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी पत्रांन्वये केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत कृषीपंपांना आठवडयातून ४ दिवस रात्री तर 3 दिवस दिवसा वीजपुरवठा करण्यात येतो. सद्यःस्थितीत अतिवृष्टीमुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले असून पुढील हंगामातील उत्पन्नासाठी दिवसा वीजपुरवठा करणे अत्यावश्यक आहे. रात्री वीजपुरवठा होत असल्याकारणास्तव शेत शिवारातील अपघात घटनेत वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत दिवसा वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्यामुळे वीजपुरवठा ठप्प असतो. तरी अमळनेर येथे ग्रामीण भागातील कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत आपल्या स्तरावरुन उचित निर्देश निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी स्मिता वाघ यांनी केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई
मिळण्यासाठी कृषी मंत्र्यांनाही दिले पत्र

अमळनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी या मागणीचेही पत्रही आमदार स्मिता वाघ यांनी कृषी मंत्री सुभाष देसाई यांना दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांचे पूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाकडून मंजूर करण्यात आलेली नुकसान भरपाईची रक्कम ही अपूर्ण असून प्रशासनाकडून तालुक्यातील मारवड, पातोंडा या महसुली मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाची रक्कम अद्याप ही मिळालेली नाही. तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळण्याबाबत आपल्या स्तरावरील उचित निर्देश तातडीने निर्गमित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *