अमळनेर (प्रतिनिधी) शेतकरी दिनानिमित्ताने सोमवारी अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे देव मोगरा माता आदिावासी शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली. या वेळी ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी दिनाचे औचित्य साधून लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवद येथे प्रधानमंत्री कृषी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत गट शेती प्रवर्तक कार्यक्रमांतर्गत देव मोगरा माता आदिवासी शेतकरी गट स्थापन करण्यात आला. या वेळी दहिवदच्या लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील, आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे, मंडळ समन्वयक धनश्री मिस्तरी, ग्रामविकास अधिकारी संजीव सैदाणे, नितीन पारधी, सुनिल चव्हाण, नंदाबाई मावळे, भटू सोनवणे, जोगीलाल पारधी, मोतीलाल सोनवणे, राजू पारधी, मिथून चव्हाण, किरण पारधी, भगवान पारधी, गणेश पारधी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.