खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

निवृत्तीचा काळ जवळ असतानाही जिद्द आणि मेहनतीने प्रा. विनय जोशी यांनी पूर्ण केली पीएच.डी.

पदार्थ शास्त्र' विषयात केले संशोधन, निवृत्तीनंतर स्विकारली पीएच.डी.पदवी

अमळनेर (प्रतिनिधी) निवृत्तीचा काळ जवळ आला असतानाही जिद्द आणि मेहनतीने प्रताप महाविद्यालयचे प्रा. विनय पुरुषोत्तम जोशी यांनी पीएच.डी पूर्ण केली. त्यांना क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दिनांक  ६ डिसेंबर  रोजी  पदार्थ शास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्रदान केली आहे.
प्रा. विनय पुरुषोत्तम जोशी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे.  त्यानंतर त्यांना पीएच.डी पदवी मिळाली. या करिता त्यांना ७ वर्षाचा कालावधी लागला आहे. डॉ. धनंजय गुजराती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. जोशी यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले. प्रा. जोशी हे एक उत्तम कलावंत, खेळाडू आहेत. त्यांची कोणत्या ही कार्या संबंधीची एकनिष्टता खुप मोठी व सकारात्मक आहे.
त्यांच्या या यशा बद्दल खा.शी. मण्डल कार्याध्यक्ष  प्रदीप अग्रवाल, कार्यपाध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, ज्येष्ठ संचालक डॉ. बी. एस. पाटील, हरि भिका वाणी, योगेश मुंदडे, निरज अग्रवाल, जितेन्द्र जैन, कल्यान पाटील, कमल कोचर, डॉ. ए. बी. जैन, प्राचार्या डॉ. ज्योती राणे, डॉ. जयेश गुजराथी, डॉ. डी. एस. भावसार, प्रा. ए. एम. जैन, प्रा. एस. ओ. माली, डॉ. ललित मोमाया,  पंकज मुन्दडे, डॉ. विजय तुन्टे, डॉ. हर्षवर्धन जाधव, डॉ. अमित पाटील, प्रा. दिपक पाटील (ग्रंथपाल), आबा मैराले,  राकेश निले आदीनी त्यांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button