खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

लग्न समारंभातून विवाहितेच्या गळ्यातील ५ तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून मारहाण

पती,सासू सासरे व दिराविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) लग्न समारंभात आलेल्या विवाहितेच्या गळ्यातील ५ तोळ्यांची सोन्याची पोत पती , सासू सासरे व दिराने हिसकावून  तोडली तसेच शिवीगाळ  आणि मारहाण केल्याची घटना १ डिसेंबर रोजी ढेकू रोडवरील धंनदाई  महाविद्यालयाजवल सकाळी ९ वाजता घडली. यामुळे लग्न समारंभात गोंधळ उडाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील गजानन नगर मधील नम्रता हेमंत माईस्कर या १ डिसेंबर रोजी अमळनेर येथील  धनदाई महाविद्यालयात लग्नाला आल्या होत्या. यावेळी त्यांचे पती हेमंत रघुनाथ माईस्कर , सासू रेखा रघुनाथ माईस्कर , सासरे रघुनाथ माईस्कर , व दिर हितेश रघुनाथ माईस्कर यांनी नम्रता च्या गळ्यातील ५ टोळ्यांची सोन्याची पोत हिसकावून तोडून नेली व तिला मारहाण शिवीगाळ केली. महिलेने सोमवारी फिर्याद दिल्यावरून पती ,सासू , सासरे व दिराविरुद्ध  भादवी ३९२, ३२३,५०४, ३४  प्रमाणे जबरी चोरीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून तपास सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button