अमळनेर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटना व पशुवैद्यकीय व्यवसायी संघटनेतर्फे तहसीलदार मिलिंद वाघ यांना बुधवारी निवेदन देऊन डॉक्टर प्रियांका रेड्डी यांची निघृण हत्या व बलात्कार घटनेचा निषेध करण्यात आला.
या घटनेचा देशभरातून याबाबत निषेध व्यक्त केला जात असून, अटक केलेल्या चौघांना कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही होत आहे. जंगली प्राण्यांनाही लाज वाटेल इतके वाईट हे कृत्य असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केलाय. अशा आशयाचे पत्र दिले असून यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. युवराज सूर्यवंशी पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकेश पाटील पशुधन पर्यवेक्षक पशुधन डॉ. सी. एन. पाटील डॉ प्रदीप पाटील डॉ युवराज पाटील डॉ. दीपक पाटील सोपान पाटील अजय पाटील चंद्रकांत लोहारे गुलाब वारुळे संजय पाटील संजय नामदेव पाटील गजानन चौधरी राजेंद्र बाविस्कर डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर भूषण जोशी प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.