अमळनेर(प्रतिनिधी)रोटरी क्लब अमळनेर ग्रामीण रूग्णालयात एड्स बाधितांना योग्य पोषण आहार मिळावा ह्या हेतूने प्रत्येकाला ६ प्रकारचे कडधान्य व मास्क वाटप करण्यात आले.
एड्स सप्तहनिमित्ताने दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता अमळनेर ग्रामीण रूग्णालयातील आय.सी.टी.सी. व ए आर टी सेन्टर येथे एड्स बाधितांना योग्य पोषण आहार मिळावा ह्या हेतुने प्रतेकाला ६ प्रकारचे कडधान्य व मास्क वाटप करण्यात आले. यात अमळनेर रोटरी क्लब, आधार बहूद्देशिय संस्था, ग्रामीण रूग्णालयातील डाॅ.प्रकाश ताळे व समुपदेशक अश्वमेघ पाटील, देवेंद्र मोरे व सेन्टरचे कर्मचारी वृंद यांनी सहभाग घेवून सहकार्य केले. प्रोजेक्ट चेअरमन रो.डाॅ.शरद बाविस्कर, रो.डाॅ.राहुल मुठ्ठे, प्रेसिडेंट रो.पुनम कोचर, सेक्रेटरी रो.वृषभ पारेख, रो.विनोद जैन, रो.चेलाराम सैनानी, रो. दिनेश रेजा, रो.अभिजित भांडारकर, रो.देवांग शहा, रो. प्रदिप पारख, रो.रोहीत सिंघवी हे उपस्थित होते.