अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या ७० ते ८० वर्षापासून रहिवास असलेल्या अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील रहिवाश्यांची स्वतःच्या नावावर घरे नसल्याने कोणताही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी नगरपालिकेने मदत करावी या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी मंगळवारी एकत्र येत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली.
शहरातील बंगाली फाईल परिसर हा स्लम एरिया, आर्थिक दुर्बल घटक आणि दलित वस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात गेल्या ७०/८० वर्षांपासून या नागरिकांचे वास्तव्य आहे.तरी पण यांना घरकुल सारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. कारण ही घरे या भागाचे मूळ मालक सुधाकर विष्णू परांजपे व त्यांची ५ वारसांची नावे ३१/७/१९५३ ला झालेल्या सर्वे नुसार उताऱ्यावर आहे.शिवाय या व्यक्तीही सापडत नाही. कारण आम्ही पुणे,मुंबई या ठिकाणीही तपास केला, असे नागरिकांचे म्हणणे असून यामुळे नागरिकांना हा लाभ भेटत नाही.या सर्व समस्येतुन पालिका प्रशासनाने काहीतरी तोडगा काढावा या आशयाने आज निवेदन देण्यात आले. यावेळी राजेंद्र यादव, सुरेश सोनवणे, चंद्रकांत मोरे, मोहन वाडकर, राजेंद्र शिंदे, संतोष शिंदे, चंद्रशेखर सोनवणे, मनोज शिंदे, भावेश शेजवळ, नरेश शेजवळ,पवन गायकवाड, बापू फणसे, सागर पोळ, दिपक पोळ, बापू खैरनार, कैलास पाटील, योगेश लटपटे, प्रसाद चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या आहे.