अमळनेर(प्रतिनिधी) सलाम मुंबई फाउंडेशन, मुंबई व शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित राज्यव्यापी तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत अमळनेर येथील पर्ल इंटरनॅशनल स्कूल तंबाखूमुक्त शाळा झाल्याचे मुख्यध्यापिका ज्योती सुहागीर यांनी जाहीर केले. यामुळे शाळेच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्ल इंटरनॅशनल स्कूल येथे तंबाखूमुक्तीचे फलक, प्रभातफेरी, बॅनर निर्मिती, सामाजिक प्रबोधन,पालक मेळावा, पालक भेटी, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मोफत मुख तपासणी,सामूहिक पथनाट्य,पोस्टर्स आदींच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर शाळेची माहिती ऑनलाईन स्वरूपात सादर केली. याकामी गटशिक्षणाधिकारी मा. राजेंद्र महाजन व भूषण महाले यांनी मार्गदर्शन केले . शाळेतील सर्व शिक्षक वृंद , कर्मचारी व पालक यांनी मोलाचे सहकार्य केले. शाळेच्या या यशाचे शाळेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे यांनी विशेष कौतुक केले. तसेच या कामाचे पालक व सर्व स्तराहून कौतुक होत आहे. गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन यांनी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच पूढील अडचणी सोडविण्यासाठी संपर्क करा असे आव्हान भूषण महाले यांनी केले आहे.