अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मंगरूळ येथील कै. दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयात मोफत सॅनिटरी पॅडबँकची सुरुवात माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. या वेळी शिरसाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मनीषा चौधरी यांनी ७ वी ते १० वीच्या १५० मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटले.
स्व. बायजाबाई चौधरी यांच्या समरणार्थ व स्व अनिल अंबर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील , जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील , डायट प्राचार्य राजेंद्र महाजन , गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन , पोलिस निरीक्षक अंबादास मोरे , विस्तार अधिकारी पी. डी. धनगर , केंद्रप्रमुख मोरे, समन्वय समिती अध्यक्ष मधुकर चौधरी , चेअरमन सुहासिनी पाटील, सचिव श्रीकांत पाटील, श्रुती पाटील, गोविंद चौधरी , आशालता चौधरी , विक्रांत पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील उपस्थित होते. तसेच याप्रसंगी अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, राजेंद्र पाटील, शशिकांत कापडणीस, सुषमा सोनवणे, शीतल चव्हाण, सीमा मोरे, प्रवीण पाटील, राहुल पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार , प्रदीप पाटील उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
माजी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की शालेय जीवनापासूनच मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीचे मनीषा चौधरी यांचे दातृत्व कौतुकास्पद आहे. शाळेतील मोफत सॅनिटरी पॅड बँक उपक्रम मुलींना सुखी जीवनाची दिशा देणारा ठरेल. सानेगुरुजी स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी विद्यार्थिनीच्या मासिक पाळी व विविध गुप्त रोगांबाबतआरोग्य व सुरक्षा याची काळजी घेण्याबाबत मार्गदशन केले. डायटचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी शासनाची मासिक पाळी संदर्भात मुलींना मार्गदशन करण्यासाठीची योजना अंमलात येण्यापूर्वीच मनीषा चौधरी यांनी राबवलेली संकल्पना अभिनंदनीय आहे. तिलोत्तमा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.