अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे भाजापाचे सर्वाधिक यशस्वी माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना सुआश्रू नयनांनी शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे मूळ गाव डांगर बु. येथे दुपारी १२ वाजात त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आला. त्यांना मुलगी भैरवी, इशा आणि तिन नंबरच्या भावाचा मुलगा तिलक यांच्या हस्ते मुखाग्नी दिला. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देताना कार्यकर्ते धायमोकलून रडले तर कुटुंबियांचे हुंदका थांबत नव्हता.अंत्यसंस्काराला भाजपासह अन्य पक्षाच्या जिल्हाभरातील नेते उपस्थित होते. तर डांगरसह तालुक्यातील सार्वसामान्य माणूसही अखेरच्या निरोपासाठी हजर होता.
डांगर येथील त्यांच्या घरापासून सकाळी ११ वजाता अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत नेत्यांसह सामान्य माणूस मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
तर ८ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय अमळनेरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे शोक सभेचं आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर आप्पा,आमदार देवयानी फरांदे,आमदार सिमा अहिरे,माजी खासदार हरी भाऊ जावळे,खासदार उन्मेष पाटील,माजी आमदार शरद पाटील,डॉ जितेंद्र ठाकूर धुळे,आमदार संजय सावकारे,माजी आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार डॉ बी एस पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील,प्रा. सुनिल नेवे, कार्यकारी अभियंता राजपूत साहेब, ग.स.अध्यक्ष मनोज पाटील,वाल्मिक मामा, पी सी आबा,मार्केट सभापती प्रफुल्ल पवार पस सभापती वजाबाई भिल, रामभाऊ संदानशिव,विनोद भैया पाटील,गोकुळ आबा बोरसे,जिल्हाध्यक्ष संजय पाटील, धुळे उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, तहसिलदार मिलिंद वाघ,शेखा हाजी मिस्तरी, मनोज बापू पाटील, विक्रांत पाटील, महेंद्र बोरसे,जयवंतराव आबा पाटील, श्याम अहिरे, निशांत अग्रवाल,बिजू नाना लांबोळे,धनगर दला पाटील,निलेश भांडारकर,सुभाष आण्णा चौधरी, अमळनेर कृषी विभागातील सर्व अधिकारी,महावितरण विभाग, तसेच आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दूरध्वनी द्वारे शोक संदेश देऊन इतर मान्यवर उपस्थित होते.तर या वेळी भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी , माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उपस्थित नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
अमळनेरात असा नेता होणे नव्हे….
उदय वाघ यांच्याकडे संघटन कौशल्य, वक्तृत्व, पब्लिक सेन्स असल्याने त्यांनी आपल्या चाणक्यनितीने अमळनेर मतदार संघाता पकड निर्माण केली होती. म्हणूनच अमळनेर मतदार संघ हा भाजपचा बाल्लेकिला म्हणून ओळकला जातो. भाजपाचे आमदार डॉ.बी.एस.पाटील तीन टर्म राहिल्यानंतर शिरीष चौधरी, कृषिभूषण साहेबराव पाटील आणि आता अनिल भाईदास पाटील यांच्या विजयात त्यांची चाणक्यनिती असल्याचे सर्वश्रूत आहे. ग्रामपंचायतपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांची भूमिका ही निर्णायक ठरली आहे. म्हणून अमळनेरच्या राजकारणात त्यांना कधीच डावलून चालले नाही. त्यांच्या चाणक्य नितीतूनच अनेक नेतृत्त्व तालुक्यात उदयास आले. त्यांनी अनेक कार्यकर्तेही घडवले. म्हणून अमळनेरात असा नेता होणे नव्हे, असेच आता म्हटले जात आहे.
महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांनो खबरदार..,
आता आमदार स्मिता वाघांना डावलल्यास…!
आपल्या संघटन कौशल्याने जिल्ह्यात भाजपाला वाढवण्यात उदय वाघांचा मोठा सिंहाचा वाटा होता. तरीही लोकसभेला आमदार स्मिता वाघ यांना तिकीट देऊन ते नंतर कापण्यात आले. त्यामुळे उदय वाघांसह स्मिता वाघांना मोठा धक्का बसला होता. तरी त्यातून सावरत त्यांनी विधानसभेची तयारी केली. मात्र तेव्हाही त्यांना डावलण्यात आले. त्यात जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा त्यांना द्यावा लागाला. पक्षाकडून एकामागून एक देण्यात आलेल्या धक्क्यांमुळे त्यांना सावरण्यात बराच वेळ गेला. त्यांनी विद्यार्थी दशेपासून आणि संघाशी जुळत भाजपाशी नाळ जोडली होती. एकनिष्ठ नेता म्हणून पक्षासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यामुळे चांद्यापासून बांधापर्यंत त्यांनी जिल्हा पिंजून काढला होता. पक्षासाठी अहोरात्र झटत राहिले. म्हणूनच भाजपात सर्वाधिक यशस्वी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नोंद आहे. तरीही त्यांच्याशी काही नेत्यांनी छळ केला आणि त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. या सर्व परिस्थितीतून जाताना ते अत्यंत संयमी आणि शांत राहिले. मात्र त्यांच्या मनात हे शल्य नेहमी बोचत राहिल्याने आपल्या विचारांचे वादळ ते थांबवू शकले नाही. म्हणून अखेर ह्रदयविकाराच्या एकाच झटक्याने त्यांना गलितगात्र केले आणि या “वाघाला” चिरनिद्रेत नेले. म्हणून या वाघाची जाण ठेवून महाराष्ट्रातील नेत्यांनी आमदार स्मिता वाघांना कुठेही न डावलता त्यांचा यथोच्छ सन्मान करावा आणि हिच खरी उदय वाघ यांना पक्षाची श्रद्धांजली राहील, अशा भावना अमळनेरकर जनतेतून आणि कार्यकर्त्यांमधून उमटू लागल्या आहेत.