अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभे राहणार

अमळनेरात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याच्या आठवणी नेहमी तेवत ठेवण्याचा मानस कार्यकर्त्यांचा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
अमळनेरात उदय वाघ यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणारे नाही. त्यांनी अनेक सर्व सामान्यांना आणि कार्यकर्त्यांना घडवले आहे. उभे केले आहे. भाजपासाठी भरीव असे काम केले आहे. त्यांच्या कार्याची नेहमी प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे अमळनेरात स्मारक उभे राहिले पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

उदय वाघ यांच्यावर शुक्रवारी डांगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अमळनेरात नगरपालिकाकडून उदय वाघ यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा देण्याचे आश्वासन. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी दिले. यामुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

समिती गठीत करून लवकरच करणार स्मारकाचे काम

अमळनेर येथे उदय वाघ यांचे स्मारक उभारण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून स्मारकाचे काम केले जाणार आहे. विशेष म्हणजे उदय वाघ यांच्या उत्तर कार्याच्या दिवशीच स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच पुतळा उभारून त्याचे अनावरण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

एकनाथ खडसे यांनी ही मान्य
केली उदय वाघांची चाणक्यनीती…

उदय वाघ यांच्यावरील अंत्यसंस्काराला उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी बोलता सांगितले की उदय वाघ अनेक वर्षे सोबत होते. अनेक निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्याही मात्र मध्यंतरी ते माझ्यापासून दूर गेले होते. पण संपर्कात होते. हे राजकारणात सुरू असते. पण ते जोपर्यंत सोबत होते, तोपर्यंत मी कोणतीही निवडणूक हरलो नाही. या त्यांच्या वक्तव्याने उदय वाघ यांची चाणक्यनीती आणि संघटन कौशल्य अधोरेखित करून जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *