अमळनेर(प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आपल्या जन्मदिनानिमित्ताने गरजू रुग्ण महिलेसाठी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले. तसेच सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देत एक सामाजिक आदर्श घालून दिला.
अमळनेर येथील मिल चाळ भागातील संगीता बारस्कर या महिलेस डॉ. बी एस पाटील यांच्याकडे तीन पिशवी A+ रक्तगटाची तातडीने आवश्यकता असल्याचे आणि सदरचे A+ गटाचे रक्त रक्तपेढीत उपलब्ध नसल्याचा संदेश रक्तदान चळवळीचे कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. सदर संदेश वाचताच सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी अमळनेर शहरातील जीवनश्री रक्तपेढीत रक्ताच्या मागणीसाठी आलेल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण अत्यल्प झालेल्या गरजू रुग्ण महिला संगिता बारस्कर यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली आणि जागेवरच तातडीने रक्तदान केले. याप्रसंगी मनोज शिंगाणे, डॉ.जिजाबराव पाटील, जीवनश्री रक्तपेढीचे संचालक डॉ. संतोष पाटील, सनी माळी, करण नेरकर, चिन्मय पाटील, दिपक प्रजापती, मनोज ठाकरे आदि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.तर सरस्वती विद्या मंदिर येथील कार्यक्रमासाठी धर्मा धनगर, ऋषिकेश महाळपूरकर, परशुराम गांगुर्डे, गीतांजली पाटील , आंनदा पाटील, संध्या ढबु आदिंनी परिश्रम घेतले.
शाळेतील कार्यक्रम सोडून धावले रक्तदानासाठी…
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना स्वतःचा जन्मदिवसाच्या निमित्ताने ठेवलेला गोड जेवण देण्याचा कार्यक्रम सुरू असतांनाच अगदी तातडीच्या क्षणी मदतीला धावून आले म्हणून गरजू महिला व त्यांच्या परिवाराने रणजित शिंदे यांचे आभार मानून जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर यावेळी महिला कार्यकर्त्या पूजा जिजाबराव पाटील यांनी ही सामाजिक जाणिवेतून सदर महिलेस रक्त दिले.तर मा.जि. प सदस्य संदीप पाटील यांनीही रक्त देऊन सदर महिलेची रक्ताची गरज तत्परतेने भागविली.