अमळनेर (प्रतिनिधी) महात्मा ज्योतिराव फुले भारतीय इतिहासातील पहिले कर्तै सुधारक आहेत. स्त्री शिक्षणाशिवाय या देशाचा विकास शक्य नाही म्हणून त्यांनी भारतातील अर्धांग असलेल्या स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे हे सोदाहरण पटवून दिले, असे प्रतिपादन केंद्रप्रमुख अरूण मोरे यांनी केले. बोलत होते.
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रप्रमुख अरूण मोरे बोलत होते. मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले. शाळेत महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त शाळेत इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापीकापासून ते शिपायापर्यंतची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने वठवली. इयत्ता दहावीतील विद्यार्थी साहिल पाटील याने मुख्याध्यापकाची भूमिका केली. तर मराठी पल्लवी वैराळे, हिंदी खुशी डांगे ,इंग्रजी वीरेंद्र पाटील ,गणित मंगेश जाधव राजेश पाटील ,भूमिती शिवाजी नाईक ,विज्ञान मोहित माळी ,सायील पाटील ,इतिहास हर्षाली महाजन, भूगोल पाटील, लिपिक हिम्मत माळी तसेच शिपायाची भूमिका नितेश पाटील ,पंकज पाटील यांनी केली. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आय. आर. महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक अरविंद सोनटक्के आय.आर.महाजन, सुरेश महाजन, एच.ओ.माळी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांनी कथन केले अनुभव
विद्यार्थी शिक्षकांचे अध्यापन झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात दिवसभर विद्यार्थी शिक्षकांना आलेले अनुभव मोहित पाटील, वीरेंद्र पाटील, वृषभ पाटील, राजेश पाटील यांनी कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी खुशी डांगे हिने केले. आभार प्रदर्शन पंकज पाटील याने आपल्या बोलीभाषेत केले. इयत्ता आठवी व नववीतील 15 विद्यार्थ्यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक कार्य यावर आपले उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले यातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षिसे दिली जाणार आहेत.
शिक्षक ईश्वर महाजन यांचा केला गौरव
पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शाळेचे शिक्षक ईश्वर महाजन यांना इंटरनँशनल पार्लामेंट या संस्थेच्या वतीने निवड करण्यात आल्यामुळे केंद्रप्रमुख अरूण मोरे, मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.