अमळनेर (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही वृद्ध माता पित्यांना उपजीविकेला पैसे न देणार्या अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील
मुलगा व सुनेविरुद्ध माता पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील सुरेश बुधा बडगुजर यांनी मारवड पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचा स्वतःचा मुलगा प्रताप व सून रोहिणी हे दोघे आपल्याला उपजीविकेसाठी पैसे देत नाही आणि पैसे मागितल्यास शिवीगाळ व मारहाण करतात. माझी पत्नी व मला सांभाळण्यास नकार देतात. त्यामुळे माझे जीवन कष्टमय झाले आहे, अशी तक्रार उपविभागीय अधिकारीकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन मुलाला आई वडिलांना वागवण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेशाचे पालन झाले नव्हते. म्हणून प्रांताधिकार्यनच्या आदेशाने वृद्धांची फिर्याद घेऊन मुलगा व सुनेविरुद्ध माता पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २३ , २४ भादवी ३२३ , ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.