अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर धुळे रस्त्यावर कर अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पिस्तूल दाखवून लुटणाऱ्या टोळीतील एकाच्या मुसक्या चौघांना एलसीबी पोलिसांनी नाशिक येथून आवळल्या आहेत. त्यांच्याजवळील ४ मोबाईल २ मोटारसायकली व रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आल्याची समजते. त्याच्या साथीदारांना ही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धुळे रस्त्यावर लूटमार झाल्याची घटना घडली होती. त्यात पिंपळकोठ्याच्या रहिवासी जगदीश पुंडलिक पाटील हा अमळनेरमध्ये राहत असल्याने त्यांच्या सोबत अमळनेरमधील काही तरुण सहभागी असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या घटनेत जगदीश विजय उदेवाल तसेच सागर संजय पाटील समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबी पोलिसांना हे सर्व सहा आरोपी नाशिक असंल्याचे समजले होते. त्यानुसार पथकाने नाशिक येथे सापळा रचून जगदीश विजय उदेवाल याला रिव्हॉल्व्हर , ४ मोबाईल व २ मोटरसायकली सह ताब्यात घेतल्याचे समजते.