अमळनेर तालुक्यात दरोडेखोरांनी घातला धुमाकुळ, मठगव्हाण येथे ग्रामस्थ आणि चोरट्यांमध्ये चकमक

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावखेडा , रुंधाटी व मठगव्हान येथे दरोडेखोरांनी बुधवारी पाहटे धुमाकूळ घालून धाडसी घरफोड्या करून लाखो रुपयांची रोकड आणि ऐवज लंपास केला. ऐवढेच नव्हे तर मठगव्हाण येथे घरमालाकाला जाग आल्याने ग्रामस्थ आणि चोरट्यांमध्ये चकमक उडाली. चोरट्यांनी गिरलोरीन दडग फेक केली. यात दोन जण किरकोळ जखमी झाले. येथे ६ चोरटे २ जाड टायरच्या मोटरसायकलींनवर फरार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर या घटनेने संपूर्ण अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांचीही झोप उडवली आहे. म्हणूनच जिल्हा अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन या डरोडेखोरांचा मागोवा घेतला.
मंगळवारी रात्री धुळे रोडवर कर अधिकारी आणि त्यांच्या मित्रांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पहाटे दरोडेखोरांनी अमळनेर तालुक्यात अक्षरशा धुमाकुळ घातला आहे. एकाच रात्री तीन गावांमध्ये धाडसी घरफोड्या केल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ही निर्माण होत आहे. आधीच ओल्या दुष्काळाने शेतरी पिचला असताना दरोडेखोरांच्या या धुमाकुळाने ते अधिकच धास्तावले आहेत.

सावखेडा येथे ८ लाख १० हजार
२०० रुपयांचा ऐवज लंपास..

सावखेडा येथे गुलाबराव दगा कदम यांचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यानी कपाटातील व डब्यातील ३५ ग्रॅम वजनाच्या एक लाख १२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, २ लाख ५६ हजार रुपयांच्या ८ तोळ्यांची मोठी माळ, २ लाख ७५ हजार रुपयांच्या ९ तोळ्यांच्या ८ अंगठ्या, ६४ हजार रुपयांची २ तोळ्यांची पोत , १६ हजार रुपयांचे ५ ग्रॅम कानातले , ७ हजर रोख असा एकूण ८ लाख १० हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला.  गुलाबराव यांचा एक  मुलगा चोपडा येथे व एक अमळनेर येथे राहत असून ते औषधोपंचारासाठी आठ दिवसांपासून अमळनेरला आलेले होते.

रुंधाटी येथून दीड लाखांच्या
ऐवजावर चोरांनी मारला डल्ला

त्याचप्रमाणे रुंधाटी येथील दिलीप भाऊराव पाटील हे देखील धुळ्याला दवाखान्यात दाखल होते. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३० हजार रुपये रोख , सुमारे सव्वा लाखाची साडे तीन तोळ्यांची मंगलपोत व १० हजार रुपयांची २३ भार चांदी असा दीड लाखाचा ऐवज चोरून नेला.

मठगव्हाण येथे दरोडेखोरांनी केलेल्या
दगड फेकीत दोन जन किरकोळ जखमी

मठगव्हान येथे जितेंद्र देवाजी पवार यांचे घर फोडून चोरट्यानी कपाटातील ४ हजार रुपये काढले आणि कपाटातील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असताना अमळनेरला राहणारे जितेंद्र पवार नेमके मठगव्हानला घरी आलेले होते. घरात झोपलेल्या पवार यांना जाग आल्याने त्यांनी कपाटाजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यानी त्यांना दगड मारले म्हणून त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला आणि आरडाओरड सुरू केली असता ग्रामस्थ जागे होऊन धावून आले.  त्यावेळी चोरट्यानी  हातातील गिलोरने दगडफेक सुरू केली. त्यात हंसराज पवार यांना पोटाला तर पप्पू पवार यांना हाताला दगड लागला. चोरट्यांची संख्या ६ होती चोरटे २ जाड टायरच्या मोटरसायकलीनवर फरार झाले.

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ताफ्यासह
भेट घेऊन घेतली घटनेची माहिती

दरम्यान, घटनेचे वृत्त कळताच पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे , डीवायएसपी राजेंद्र ससाणे , पोलिस निरीक्षक अंबादास मोरे , सहाययक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर , पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र माळी , श्वानपथक प्रमुख शेषराव राठोड , पोलीस नाईक शरद पाटील यांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *