अमळनेर (खबरीलाल विशेष) जिल्हा परिषदेकडून पाच ते दहा लाखांपर्यंतची कामे देण्यासाठी सर्रास लाखो रुपयांची टक्केवारी घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचे सर्व पुरावे ‘खबरीलाल”च्या हाती आले आहे. विशेष म्हणजे या चौकडीने आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याकडून पैसे घेऊन त्याला मेटाकुटीस आणले. तर यात निव्वळ पदाधिकारीच नव्हे तर अधिकारीही सहभागी असल्याचे ठोस पुरावे आहेत.
यामुळे खळबळ उडाली आहे
अमळनेर येथील एका सामान्य कार्यकर्त्याने काम मिळण्यासाठी आपल्या ” ९ नाथांपैकी” एक “नाथ” ”बापू” च्या मदतीने जिल्हा परिषदेच्या “मुख्य कारभारीच्या” चेंबरमध्ये तेथील ”बापूसाहेब” ला दोन वर्षांपूर्वी चक्क १ लाख रुपये कॅश दिली होती. याला एक गुरूजी आणि बापूही आयविटनेस होते. दोन वर्ष काय पण टर्म संपली तरी या कार्यकर्त्याला कोणतेही काम या चौकडीने दिले नाही आणि त्याचे पैसेही परत केले नाहीत. पैसे देऊनही आपल्याला काम मिळाले नाही म्हणून या कार्यकर्त्याने पैसे परत मिळण्याची मागणी लावून धरली.
जिल्हा परिषद कार्यालयात ”केदारे”श्वर आणि श्री ”गणेश’ भगवान विराजमान…
कार्यकर्त्याने बापूसाहेबांकडे पैसे परत मागण्याचा धोसा लावला. त्यामुळे त्याला जिल्हा परिषदेत विजारजमान ”केदारे”श्वर, श्री ”गणेश’चे दर्शन घ्यायला लावले. त्यांच्या माध्यमातून काम होईल, असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे त्याने अनेकदा जिल्हा परिषदेत खेटरा झिजवल्या. दोन्ही देवांचे दर्शन घेतले. पण त्याला दाद मिळाली नाही. तसेच या दोन्ही भगवानांना ”प्रसाद” चढवल्याशिवाय जिल्हा परिषदेत काम होत नाही, म्हणूनच त्याने “काट्या”वर अंग टाकले आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे या कार्यकर्त्याला कसे गंडवले गेले आणि भंडावले गेले याच्या सर्व संवादाच्या ऑडिओ क्लिप ”खबरीलाल”च्या हाती लागल्या आहेत.
#जळगांव जिप पर्दाफाश