खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

अस्सल अहिराणीचा बाज असलेल्या कविता, गाणी आणि भाष्यांनी रंगले खान्देशी बोली साहित्य

मन्हीं अहिराणी ना गोडवा' सत्रात मांडला अस्सल अहिराणी भाषेतील गोडवा

अमळनेर (प्रतिनिधी) अस्सल अहिराणीचा बाज असलेल्या कविता, गाणी आणि भाष्यांनी विभागीय खान्देशी बोली साहित्य संमेलनात दुसर्‍या दिवशी रविवारी चांगलेच रंगले. ‘मन्हीं अहिराणी ना गोडवा’ या
सत्रात अहिराणी भाषेतील गोडवा मांडणाऱ्या कार्यक्रमाने अहिराणी संस्कृतीची एक सुंदर झलक मंचावर रसिकांना पाहायला मिळाली.
या कार्यक्रमाचे तहसीलदार सुदाम महाजन यांनी बहारदार प्रास्ताविक केले. ‘माय मन्हीं अहिराणी, नेसस अमळनेरन खण’ अशी मांडणी करून त्यांनी अहिराणी भाषेला अमळनेरमध्ये मिळणारा मान सन्मान व्यक्त केला. शिरपूर येथील अहिराणी कलावंत नारायण महाजन यांनी ओघवत्या शैलीत सादर केलेल्या. अहिराणी भाषेतील रचना प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन गेल्यात.
सकाळ सत्रात स्वागताध्यक्ष दिलीप सोनवणे, प्रकाश वाघ ,सुमित धाडकर यांनी मान्यवरांचा स्वागत सत्कार केला. यावेळी सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.ज्योती राणे, सभागृहात अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, कवी रमेश पवार ,डॉ. एस. के. पाटील, चेतन सोनार, संजय चौधरी, रणजित शिंदे, प्रा. लिलाधर पाटील, वसुंधरा लांडगे, भारती गाला, अपेक्षा पवार, अॅड. तिलोत्तमा पाटील, नगरसेवक साखरलाल महाजन, शैलेश काळकर, नगीणचंद लोढा, भीमराव जाधव, हेमंत भांडारकर, पी. एन. भादलीकर, चंद्रकांत नगावकर, प्रा. शैलजा माहेश्वरी आदिंसह पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, किरण पाटील, पत्रकार संजय पाटील, उमेश काटे, जितेंद्र ठाकूर , जयेश काटे, ग्रंथालयाचे संचालक ईश्वर महाजन, दिपक वाल्हे आदिंसह मोठ्या संख्येने मान्यवर व साहित्य प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश धर्माधिकारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन माधुरी भांडारकर यांनी केले.

माय मनः जल्दी लगीन कर।
लोक मले म्हंनतस निब्बर

आईची महिमा सांगणारी अहिराणी गाणी प्रभावी ठरली तर ‘सातपुडा ने पायथा ले शे मनह गांव’ असे गावाचे वर्णन करत आजच्या ग्रामीण जीवनात निर्माण झालेला आपआपसातील दुरावा…
‘आधी पाच पंचसवर धकी जाय आम्हाना..
आते सुप्रिम कोर्ट मा चालना गया गावगाडा’ या अहिराणी शब्दातून मांडला.
” बेटी धन न पेटी
गर्भ मा मारी टाकी”
तसेच….
‘लेक मारी मारी,
व्हई ग्यात कमी पोरी,
पोऱ्या कसं लगिन करी।
या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या रचनांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. तर ग्रामीण भागात निर्माण झालेल्या लग्नाच्या समस्येवर केलेले मार्मिक भाष्य ….माय मनः जल्दी लगीन कर।
लोक मले म्हंनतस निब्बर। सभागृहात हास्य फुलविणारे ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button