चांगल्या नेतृत्वाची निवड करून अमळनेरचा आवाज विधानसभेत पोहचवला – रुपाली चाकणकर यांचे प्रतिपादन

अमळनेर(प्रतिनिधी) अनेकांनी शरद पवारांची साथ सोडली, मात्र बळीराजा टिकण्यासाठी आणि लोकशाही जीवंत राहण्यासाठी पवारांच्या लढ्याला साथ देणाऱ्या मावळ्यांचे आणि महिलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि चांगल्या नेतृत्वाची निवड करून अमळनेरचा आवाज विधानसभेत पोहचविण्याचा जो निर्णय घेतला, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले.

रुपाली चाकणकर अमळनेर येथे आल्या असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या पुढे म्हणाल्या, अहिराणी भाषा समजली नाही तरी अमळनेरच्या महिलांच्या भावना समजल्या. समाजाभिमुख कामे करा , महिला सक्षमीकरण करायचे आहे , मात्र समाजकारण आणि राजकारण करताना पोटासाठी उद्योग करणे ही आवश्यक आहे म्हणून बचत गटांच्या माध्यमातून विविध उत्पादन करा. त्याला बाजरपेठ उपलब्ध करून दिली जाईल. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न घेऊन शाळा महाविद्यलयात महिला कार्यकर्त्यानी सहभागी व्हायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाळांमध्ये तक्रार पेट्या लावा, स्वच्छनदी अभियान राबवा , महिलांवर अत्याचार करणारे जवळचे असतात त्यामुळे महिलांना जागृत करण्याचे काम करा , मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस मीनल पाटील, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख, मीनाक्षी चव्हाण, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, जि प सदस्या जयश्री पाटील, रिता बाविस्कर, योजना पाटील, आशा चावरीया, अलका पवार, अश्विनी पाटील, शीला पाटील, कविता पवार आदी महिला उपस्थित होत्या.यावेळी करुणा सोनार, संगीता लोहार, शोभा चव्हाण, उषाबाई पवार गंगापुरी, रंजनाबाई भिल सडावण, निसर्डी सरपंच वैशाली पाटील, अंतुर्ली रंजाणे सरपंच शीतल पाटील, गुजराथी महिला मंडळ अध्यक्षा विजया जैन, चांदणी कुर्हे सरपंच निलाबाई भिल चांदणी कुर्हे, प्रबोधिनी सोनवणे, मंगलाबाई ज्ञानेश्वर पाटील टाकरखेडा, हर्षदा पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रवादी कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर दिसला पाहिजे

बळसाने जिल्हा धुळे येथे तलाठ्यानी पंचनामा व्हाट्स अप ग्रुप करून पंचनामे केले हा प्रकार विचित्र वाटला , शेतक्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही पंचनाम्यासाठी कर्मचारी बांधावर गेला पाहिजे , मिळालेली मदत तुटपुंजी आहे राष्ट्रवादी कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला पाहिजे, राजकारण निवडणुकी पूरता आहे इतरवेळी आपण जनतेचे सेवक आहोत हे लक्षात ठेवा असे आवाहन ही त्यांनी केले.

अमळनेर तालुक्यातील महिला संघटन चांगले

जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील म्हणाल्या की राज्याचे नेतृत्व स्वीकारताच रुपाली चाकणकरानी महाराष्ट्र पिंजून काढला आणि महिलांमध्ये नवी प्रेरणा दिली अमळनेरची निवडणूक जनतेची होती. कल्पना पाटील म्हणाल्या अमळनेर तालुक्यातील महिला संघटन चांगले आहे पक्ष सोडून जात असताना महिला मात्र टिकून राहिल्या नंदुरबारच्या जिल्हा कार्याध्यक्षा करिष्मा पाटील , योजना पाटील , रिटा बाविस्कर , आशा शिंदे , शबनम शेख , ज्योती पाटील, छाया गवळे , भावना देसले , यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

महिलांनी रुपाली चाकणकर यांच्या पाठीशी राहून पक्ष बळकट करावे : आमदार अनिल पाटील

आमदार अनिल पाटील म्हणाले की शपथ विधी होण्याच्या आधी रुपाली चाकणकारांनी शब्द पाळला. त्यांच्या आवाहनानुसार सकाळी ११ पर्यंत ४५ टक्के मतदान महिलांनी करून दाखवले. महाराष्ट्रात अमळनेर आघाडीवर होते. महिलांनी मला मंत्रिपदाची मागणी केली ती साहजिक आहे. मात्र मी पक्ष नेतृत्वाने जे दिले त्यात समाधानी आहे. माझ्या मंत्री पदापेक्षा रुपाली चाकणकराना विधानपरिषदेत घ्यावे, असे मला वाटते. वयाच्या ८० वर्षी शरद पवार साहेब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वणवण भटकत आहेत. त्यामुळे महिलांनी रुपाली चाकणकर यांच्या पाठीशी राहून पक्ष बळकट करावे, असे आवाहन ही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *