अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पैलाड रोड व गांधलीपुरा भागात छापा टाकून पत्याचा जुगार खेळणाऱ्याचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसाना पाहून अनेकांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी आठ जुगारीना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.
या बाबत माहिती अशी की, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी दीपक माळी, शरद पाटील, राजेश चव्हाण, भूषण बाविस्कर, विनोद धनगर, नाना चित्ते, दिलीप जाधव या पोलिसांच्या पथकासह बोरी नदी काठावरील ईदगाह जवळील विट भट्टीजवळ तसेच पारोळा रस्त्यावर हॉटेल रवीच्या मागे जुगार अड्ड्यावर धाडी टाकल्या. यामुळे जुगाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
झंन्ना मन्ना जुगार खेळताना यांच्या आवळल्या मुसक्या
अनिल पाटील , अरुण चंदनशिव , समाधान भोई , गुलाब मोरे , अक्षय गोयल , नासिर शेख मेहमूद , सुरेश जेधे ,राहुल गोयल याना झंन्ना मन्ना जुगार खेळताना अटक करून त्यांच्याजवलील ४ भ्रमणध्वनी , तसेच ३४ हजार रुपयांची रोख रक्कम , पत्याचे कॅट असे एकूण ६० हजार रुपयांचा माल जप्त केले असून सर्व आरोपीना मुंबई जुगार कायद्यान्वये अटक करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे करीत आहेत.