खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

पातोंडा येथे छपा टाकून चार जुगाऱ्यांवर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केली धडक कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) ­स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी तालुक्यातील पातोंडा येथे छपा टाकून चार जुगाऱ्यांवर धडक कारवाई केली. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. सदर आरोपींकडून पातोंडा बाजार पट्टा चौक टपरीच्या पाठी मागुन ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन पत्याची कँट तसेच जुगारात एकुण रक्कम 3510 रुपये मुद्देमाल जप्त करून पो.स्टे ला गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी रामचंद्र बोरसे , नारायण पाटील , ईश्वर सोनवणे ,मनोज दुसाने यांनी अमळनेर पो.स्टे ला भाग 6 Cctns 0429/2019 मु.जुगार अँक्ट 12अ, प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहेत.

अटक करण्यात आलेले जुगारी असे आहेत

जुगार खेळणाऱ्या सुनील आत्माराम पाटील , बळीराम रामदास पाटील , राजेंद्र उखा पाटील ,राजेंद्र निकम पाटील यांना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button