खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

प्लास्टिक विक्रेत्याला कॅरीबॅग बाळगणे पडले महागात, नगरपालिकेने केला 5 हजारांचा दंड

अमळनेर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये उडाली खळबळ

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरातील सुभाष चौकातील कोमल प्लास्टिक सेन्टर येथे नगरपालिकेच्या प्लास्टिक निर्मूलन पथकाने कारवाई करून प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्याची कारवाई रविवारी केली. याप्रकरणी दुकानदाराला पाच हजार रुपयाचा दंड केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यापुढे ही कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्यात सर्वत्र प्लास्टिकबंदी लागू केलेली आहे. त्यानुसार शासनाच्या सुचना असून अमळनेर नगरपरिषदेने ही शहरात प्लस्टीक बंदी केलेली आहे. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर नगरपरिषद हद्दीत प्लास्टिक निर्मूलन पथक तयार केलेले असून त्या पथकाने २७/१०/२०१९ रोजी सकाळी ११:३० वा. सुभाष चौकातील कोमल प्लास्टिक सेन्टर येथे पाहणी केली असता या दुकानातून बंदी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्या. त्या जमा केलेले प्लास्टिक कॅरीबॅगचे वजन ११ किलो १५४ ग्रॅम असून त्याच्यावर ५००० रुपये दंड करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई

या कार्यवाहीत आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे यांच्यासह अरविंद कदम, राधेश्याम अग्रवाल, विजय सपकाळे संगणक चालक, कर्मचारी चन्दू बिऱ्हाडे, गोपाल बिऱ्हाडे अविनाश बिऱ्हाडे सह कर्मचारीनी कार्यवाही केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button