खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

साने गुरुजी विद्यालयाच्या भावेशची कुस्तीत तर हर्ष याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. यात दहावीतील विद्यार्थी भावेश प्रवीण पाटील याची शालेय १७ वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत ११० किलो वजन गटात तर हर्ष प्रताप शिंपी याची ज्युडो- कराटे स्पर्धेत राज्य स्तरावर निवड झाली आहे.
भावेश हा तांबेपुरातील माजी नगरसेवक व अर्बन बँकेचे संचालक प्रवीण पाटील यांचा मुलगा आहे तर यश हा नगरसेवक प्रताप अशोक शिंपी यांचा मुलगा आहे .
या विद्यार्थांना क्रीडा शिक्षक संदीप बाबुराव घोरपडे, विलास चौधरी तसेच त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील , संस्थेचे अध्यक्ष हेमकांत अनंतराव पाटील , सचिव संदीप बाबुराव घोरपडे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. डी. देशमुख सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button