खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

सत्तेत असताना विकास करु न शकलेले भूमिपुत्र सत्तेच्या विरोधात जाऊन कोणता पाऊस पाडणार..?

बाजार समितीचे संचालक पराग पाटील यांनी अनिल पाटील यांना उपस्थित केला प्रश्न

अमळनेर( प्रतिनिधी) अनिल भाईदास पाटील यांनी सत्तेत राहूनही विकास केला नाही. त्यामुळे विरोधात राहून ते कोणता विकासा पाऊस पाडणार आहेत. ते केवळ भूमिपूत्र असल्याचा अविर्भाव आणत असून त्यांना मतदार संघाविषयी उमाळे फुटत आहे. ते गेली पाच वर्ष राजकारणातून बाद झाल्यासारखे वागले. त्यामुळे ते आता भावनिक राजकारण करू पाहत असून त्यांना मतदार भीक घालणा नाहीत, अशी टिका करून आमदार शिरीष चौधरी यांनी १५५० कोटी रुपयांपर्यंतचा विकास निधी या मतदारसंघासाठी ओढून आणला. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास बाजार समितीचे संचालक पराग पाटील यांनी व्यक्त केला आहे. अमळनेर मतदार संघात आज जे भावनिक राजकारण करत आहेत त्यांना नगरपालिकेत, जिल्हा बँकेत, जिल्हा परिषदेला तीन टर्म संधी देण्यात आली होती. परंतु त्यांनी ठोस असे कोणतेही काम केले नाही. लोकप्रतिनिधीच्या कामाची धमक पाहिली जाते. त्याच्या पाठीशी सत्ता आहे की नाही हे पाहिले जाते. केंद्रात भाजपाची सत्ता आहे, राज्यात पण भाजपाचीच सत्ता येईल, त्यामुळे विरोधी पक्षातल्या भुमिपुत्राला मत देऊन काय साध्य होणार? हे मतदार पूर्ण ओळखून आहेत. त्यामुळे भूमिपुत्र हा मुद्दा कुचकामी ठरणार असून जातीच्या नावाखाली मत मागणारे कमकुवत विचार सरणीचे असतात. मतदार राजा भाजपा सेना माहायुतीचे उमेदवार शिरीष चौधरी यांनाच पूनश्च निवडून देतील, असा विश्वास पराग पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पाच वर्षात काही कळवळा का दाखवला नाही..?

अमळनेर मतदार संघात आणखी चार-पाच उमेदवार आहेत. त्यामुळे ते स्थानिक असून ते भूमिपुत्र नाहीत का? असाही प्रश्‍न केला जात आहे. म्हणून भूमिपुत्र असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांबद्दल जनतेमध्ये तीव्र संताप आहे. लोकांमधून देणग्या गोळा करून आपला उमेदवारीचा शंड शमवून घेणाऱ्या उमेदवाराबद्दल कडवट प्रतिक्रिया ग्रामीण भागातून उमटल्या असून सत्ता दिली तेव्हा काहीही करू न शकलेले हे भूमिपुत्र आता सत्तेबाहेर राहून कोणता विकासाचा पाऊस पडणार आहेत? असे प्रश्न मतदार उपस्थित करित आहेत. देणग्या गोळा करण्याचा स्टंट करणाऱ्या या भूमिपुत्राने अमळनेर मतदारसंघाविषयी गेल्या पूर्ण पाच वर्षात काही कळवळा का दाखवला नाही? रखडलेल्या प्रश्नांवर आवाज का उठवला नाही? असा प्रश्न उपस्थित होतो.
भावनिक राजकारण करण्यावर भर वास्तविक अमळनेर मतदारसंघात अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. ते कोणामुळे प्रलंबित राहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी या भूमिपुत्रांनी यापूर्वी कधी काही केले आहे का? याची तपासणी करण्याची वेळ आज आली आहे. बंद अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजना, रखडलेला माळण पांझरा नदीजोड प्रकल्प, अपूर्ण क्रीडा संकुल यासह अनेक प्रलंबित कामाविषयी व अवैध धंद्याविषयी हे कोणीही बोलले नाही. कधी पाठपुरावा करताना दिसले नाही. त्याविषयी कोणतीही चर्चा न करता आता फक्त भावनिक राजकारण करण्यावर भर देण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात ह्या प्रलंबित कामाविषयी कोणताही पाठपुरावा केला नाही वा त्याविषयी आवाज उठवला नाही. खरं तर अमळनेरच्या विकासाचे व्हिजन घेऊन कोणीही पुढे येत नाही हे अमळनेरकरांचेच दुर्दैव म्हणावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button